Monday 19 November 2012

. टा . प्रतिनिधी , मुंबई

ज्या शिवाजी पार्कने (शिवतीर्थ) ' माझा हा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करीत आहे ', ही प्रबोधनकारांची वाणी ऐकली ... ज्या शिवाजी पार्कने ' जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो , भगिनींनो आणि मातांनो ...' अशी कोट्यवधी मनांमध्ये धगधगते विचार चेतवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खणखणीत हाक ऐकली त्या शिवाजी पार्कने रविवारी अलोट जनसागराच्या अतीव दुःखाचा कल्लोळ अनुभवला . महाराष्ट्रातील कोट्यवधी जनांच्या हृदयात अढळ आदराचे व प्रेमाचे स्थान असणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना या ऐतिहासिक मैदानात रविवारी संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला ... ' बाळासाहेब अमर रहें ...' च्या घोषणांचा स्वर वाढला आणि शिवाजी पार्कातील प्रत्येक माणूस हेलावून गेला . शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पित्याच्या पार्थिवास मंत्राग्नी दिला आणि माथ्यावरील आभाळ नाहीसे झाल्याच्या भावनेने उपस्थित ठाकरे कुटुंबीय , लक्षावधी शिवसैनिक , तसेच हा दुःखद प्रसंग टीव्हीवर पाहणाऱ्या अवघ्या महाराष्ट्राचा शोक अनावर झाला . कित्येक दशके जनमानसावर अधिराज्य गाजवणारे बाळासाहेब देहरूपाने इहलोकातून निघून गेले ते कोटी कोटी जनतेच्या हृदयात कायमचे वसतिस्थान वसवून ...

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास वांद्रे येथील ' मातोश्री ' येथून निघालेली बाळासाहेब यांची सुमारे पाच िकलोमीटर लांबीची महायात्रा नऊ तासांच्या प्रवासानंतर लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने दुपारी साडेचार वाजता शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यापाशी आली . त्यावेळी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर जमलेल्या शिवसैनिकांना दुःखावेग आवरणे कठीण झाले . संध्याकाळी पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोरील प्रवेशद्वारातून बाळासाहेबांचे पार्थिव सरकारी इतमामात शिवाजी पार्कवरील स्टेजवर आणण्यात आले . ` एकच वाघ , एकच वाघ , बाळासाहेब एकच वाघ ', ` परत या , परत या , बाळासाहेब परत या ' ` कोण आला रे कोण आला , शिवसेनेचा वाघ आला ' या घोषणांनी शिवाजी पार्कचे मैदान दुमदुमले . यावेळी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील असंख्य बड्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले . त्यावेळी तेथे उभे असलेले उद्धव आणि राज यांचे त्यांनी सांत्वनही केले .

संध्याकाळी ५ . २०च्या सुमारास बाळासाहेबांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले . त्यांच्या पार्थिवाभोवतीचा तिरंगा सन्मानाने काढून तो उद्धव यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला . उद्ध्व यांनी अंत्यविधी सुरू केले तेव्हा बाळासाहेबांच्या पार्थिवापाशी बाळासाहेबांचे मेव्हणे चंदूमामा वैद्य , जयदेव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य , राहुल आणि तेजस ही नातवंडे आदी कुटुंबीय उभे होते . श्री भय्यू महाराज यांचीही उपस्थिती होती .

हे विधी सुरू असतानाच उद्धव यांनी , बाळासाहेबांना सावलीसारखी साथ करणारे चंपासिंग थापा , बाळासाहेबांचे पी . ए . रवी म्हात्रे , डॉ . जलील परकार आणि त्यांचे सहकारी डॉक्टर , वॉर्डबॉय यांनाही अंतिम अभिवादन करण्यास बोलावले . ५ . ५०च्या सुमारास स्वतः उद्धव यांनी वडिलांचे अंतिम दर्शन घेतले , तेव्हा त्यांना अश्रू मोठ्या कष्टाने परतवावे लागत होते . पाठोपाठ राज , जयदेव यांनी अंत्यदर्शन घेतले . सकाळपासून धीरगंभीरपणे वावरणाऱ्या राज यांना यावेळी अश्रूंना बांध घालणे कठीण झाले . आदित्य , तेजस , राहुल आदी बाळासाहेबांची नातवंडे रडता रडताच परस्परांचे सांत्वन करत होती .

काही क्षणातच बाळासाहेबांचे पार्थिव चितेवर ठेवण्यात आले . पोलिसांनी बंदुकांच्या फैरींची सलामी दिली . पोलिस बँण्डने बिगुल धून वाजवून अखेरचे अभिवादन केल्यानंतर रामरक्षेचे पठण करण्यात आले . मंत्राग्नी देण्याच्या क्षणी उद्धव यांनी राज यांना हाताला धरून सोबत घेतले . पठणाच्या अखेरीस उद्धव यांनी चितेस अग्नी दिला . ' जब तक सूरज चांद रहेगा , बाळासाहेब आपका नाम रहेगा ', ' बाळासाहेब अमर रहे ' हा उद्घोष मनात साठवत जमलेले लाखो शिवसैनिक अत्यंत शिस्तीत परतले .

लाखोंची गर्दी

शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे १९ लाख लोक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता . त्याला पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही . मात्र , अंत्ययात्रा आणि अंत्यदर्शनासाठी लोटलेली गर्दी काही लाखांच्या घरात होती असे पोलिसांचे म्हणणे होते .

सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते 'फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठीचित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.
'मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिक

पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीचसुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्याउद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्‍यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. इ.स. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. 'हर हर महादेवची' गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा. एक दिवशी वडिलांनी, प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काही नाव सुचतय का संघटने साठी?” बाळासाहेब बोलले ..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…” “मि सांगतो नाव….....शिवसेना.........यानंतर बाळासाहेबांनी जून १९, इ.स. १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्यालक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर ३०, इ.स. १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून, गर्दी आणि बाळासाहेब ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये.
‘सामना’ - दैनिक वृत्तपत्र

वक्तृत्वाबरोबरचभेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्याव्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व प्रल्हाद केशव अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पहात असतो.
शिवसेना - भाजप युती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातूनशिवसेना-भा.ज.प.युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे इ.स. १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्‍या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
हिंदुत्व

हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्‍या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्‍या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राटही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच